top of page

भारताच्या अतिप्राचीन ध्यानविधींमध्ये विपश्यना एक विधी आहे. तिचा शोध गौतम बुद्धांनी जवळ-जवळ २५०० वर्षांपूर्वी केला होता.

म्यमामधील प्रसिद्ध विपश्यनाचार्य सयाजी ऊ बा खिन यांनी विपश्यनाचार्य स्वर्गीय स. ना. गोयंकांना हा विधी शिकविण्यासाठी अधिकृत केले.मूळ भारतीय असलेल्या स. ना. गोयंकांचा जन्म म्यंमाच्या मांडलेशहरात झाला. ते गृहस्थ होते व तेथील प्रसिद्ध व्यापारी होते. १९४७ मध्ये त्यांचा परिवार रंगून येथे जाऊन वसला. त्यांनी विपश्यनेचे पहिले शिबिर सयाजींसोबत १९५५ मध्ये आंतरराष्ट्रीय ध्यान केंद्र, रंगून येथे केले. या शिबिरात गोयंकाजींना असा अनुभव झाला की ज्यामुळे त्यांचे जीवनच बदलून गेले.

१९६९ मध्ये गोयंकाजी भारतात परत आले आणि ह्या प्राचीन ध्यान विधीला हिच्या जन्मस्थानी शिकवण्यास प्रारंभ केला आणि तिचा प्रचार-प्रसार संपूर्ण जगात केला आणि विश्वभरात जवळजवळ २२० ध्यान केंद्र स्थापन केली गेली. सर्व ध्यान केंद्रांचा खर्च ऐच्छिक दानातून चालतो. विपश्यना विधी शिकविण्यासाठी कोणतेच शुल्क घेतले जात नाही. आज हा विधी जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये उपलब्ध आहे. शेकडो-हजारो लोक दरवर्षी विपश्यना शिबिरात जाऊन विपश्यना विधी शिकतात.

 

पुस्तक परिचय

 

प्रज्ञा विकसित करणारी विपश्यना बुद्धांच्या शिकवणुकीचे सार आहे. श्री गोयंकाजींद्वारे शिकवली जाणारा हा साधना विधी, जो सतत जागृत राहण्याचा मार्ग शिकवतो, तो आपल्या सरळतेमुळे असाधारण आहे. मत विहीन आणि तत्काळ फलदायी विपश्यनेच्या या तंत्राचा कोणत्याही परिस्थितीत सफलतापूर्वक उपयोग केला जाऊ शकतो.

 

श्री. स. ना. गोयंकाजींच्या लेखांवर व प्रवचनांवर आधारित आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली लिहिले हे पुस्तक विपश्यना साधनेची भूमिका स्पष्ट करते. त्यासोबतच हे ही सांगते की कसे या साधनेचा उपयोग समस्यांची सोडवणूक करण्यासाठी केला जाऊ शकतो, कसे आम्ही आपल्या असामान्य आंतर-शक्तीचा विकास करु शकतो, कसे शांतिपूर्ण व रचनात्मक जीवन जगू शकतो. यात गोयंकाजींद्वारे सांगितलेल्या गोष्टीसुद्धा आहेत, तसेच साधकांद्वारे विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरेही आहेत. यामुळे त्यांची शिकवण्याची कला स्पष्ट होते.

 

यात विपश्यना शिकवण्याच्या कलेचे पूर्ण वर्णन आहे. हे पुस्तक साधकांसाठी तसेच जे साधक नाहीत त्या दोषांसाठीही उपयोगी आहे.

जगण्याची कला - विपश्यना साधना (मराठी)

₹100.00Price
  • AUTHOR: WILLIAM HART
  • PUBLISHER: VIPASSANA RESEARCH INSTITUTE
  • LANGUAGE: Marathi (मराठी)
  • EDITION: 2022
  • Publ. Year: 1988
  • PAGES: 202
  • BOOK TYPE: PAPERBACK
bottom of page